बिजनेस

खुशखबर ! सोलापुरात ‘या’ दिवशी पेट्रोलचे मोफत वाटप

सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्याला अनुसरून ज्या महिला व मुलींची नावे ” प्रणिती” आहे त्या माता -भगिणींच्या  दुचाकी वाहनांसाठी मोफत एक लिटर पेट्रोल दिले जाणार आहे. हा कार्यक्रम दि.९ डिसेंबर रोजी ठिकाण- वेलाणी HP पेट्रोल पंप, सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या शेजारी होणार आहे.
हा कार्यक्रम काँग्रेससह अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी अनेकांनी आपला सहभाग नोंदवावा तसेच सोबत आधारकार्ड घेऊन यावे अशी माहिती सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे यांनी दिली.

Related Articles

Back to top button