सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरात अपघातांची मालिका : हैदराबाद रोडवर पुन्हा अपघात ! एक जण जागीच ठार तर चार सिरीअस

सोलापूर शहर परिसरात अपघाताचे सत्र सुरूच असून काल मित्र नगर परिसरात एका रिक्षाला ट्रकने धडक दिल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले होते तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना घडली त्याच वेळेस सोलापूर शहराजवळ असलेल्या दोड्डी फाटा हैदराबाद रोड याठिकाणी काल दुपारी तीनच्या दरम्यान मोटर सायकलवरून दवाखान्यास जाणाऱ्या वडील, मुलगी आणि मुलीचे तीन मुली यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला. 
त्या अपघातात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला आहे तर मोटरसायकलवर जाणारी एक महिला व त्याची तीन मुली हे गंभीररित्या जखमी झाल्याची  घटना घडली आहे.
अर्जुन रामा चव्हाण (राहणार दोड्डी तालुका दक्षिण सोलापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. जया, वैभवी, मेघा, भाग्यश्री अशी इतर जखमींची नावे आहेत.
जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे उपचार सुरू असून त्यातील महिलेची परिस्थिती अति गंभीर आहे.

Related Articles

Back to top button