राजकीय

कोणाला किती पैशांच्या ऑफर गेल्या हे ठाऊक आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करत गेलेल्या आमदारांनी 50 खोके घेतल्याचे आरोप ठाकरे गटासह सर्वच विरोधी पक्ष करत आहेत. यावरून शिंदे सरकार आणि विरोधकांकडून आरोप- प्रत्यारोपही झाले. या 50 खोक्यांच्या आरोपावरून राजकारण रंगताना दिसते.
अशात खोक्यांच्या आरोपांत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक विधान केले आहे.
पैशांची आमिष दाखवली जात आहेत. मला माहिती आहे, कोणा कोणाला किती पैशांच्या ऑफर गेल्या,असे खळबळजनक विधान राज यांनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणातील खोक्यांचे आरोप खरे आहेत की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज हे कोकण दौऱ्यावरून असून आज त्यांनी राजापूर तालुक्याला भेट दिली.
यावेळी राज यांच्या हस्ते राजापूर तालुक्यातील कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले. राज म्हणाले की, फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, परंतु महाराष्ट्र सैनिक फुटत नाही, त्याबद्दल त्यांचा अभिमान आहे.
पैशांची आमिष दाखवली जात आहे. कोणा कोणाला किती पैशांच्या ऑफर गेल्या मला माहिती आहे. पण कडवट, निष्ठावान असणे या गोष्टींच यशात रुपांत होईल याबाबत निश्चिंत रहा.

Related Articles

Back to top button