खेळ

मस्तच! इंग्लंडने पाकिस्तानची लायकीच काढली

पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंड संघाने धावांचा डोंगर उभा केला. टी -२० मध्ये दुसऱ्यांदा विजेता बनल्यानंतर इंग्लंडच्या संघाने जगातील सर्वात भेदक गोलंदाजांची फळी असणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. पाकिस्तानचे जलदगती गोलंदाज सामन्यात हतबल दिसून आले. 

इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतक ठोकले. खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडने ७५ षटकात ४ बाद ५०६ धावांचा डोंगर उभा केला होता. ही धावसंख्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाद्वारे पहिल्या दिवशी करण्यात आलेली सर्वाधिक धावसंख्या आहे.
इंग्लंडने जॅक क्रॉली (१२२), बेन डकेट (१०७), ओली पोप (१०८) आणि हॅरी ब्रूक (नाबाद १०१) यांच्या शतकांच्या बळावर पाकिस्तान विरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चार गड्यांच्या मोबदल्यात ५०६ धावा कुटल्या. यापूर्वी टेस्ट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने १९१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ६ वाद ४९४ धावा केल्या होत्या.
पाकविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये केवळ जो रूट (२३) एकमेव फलंदाज आहे, ज्याने शतक झळकावले नाही. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या पाटा खेळपट्टीवर पाकिस्तानी गोलंदाज पूर्णपणे हतबल ठरले. क्रॉली आणि डकेट या सलामी जोड़ीने सहाहून अधिक च्या सरासरीने ३५.४ षटकात २३३ धावांची भागीदारी केली.

Related Articles

Back to top button