मनोरंजन

सिगारेटचे चटके दिले, मारहाणही केली ; सलमानवर गंभीर आरोप

अभिनेत्री सोमी अलीने एका पोस्टमधून अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सोमीने तिच्या पोस्टमध्ये सलमानचे नाव कुठेही लिहिले नाही. परंतु तिने जे काही आरोप लिहिले आहेत. त्यामध्ये तिथे सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान तिला गुलाबाचे फुल देताना दिसत आहे. 

त्यानंतर सोमीने ही पोस्ट डिलीट देखील केली आहे. परंतु या पोस्टमधून सोमीने लिहिलं होतं की, त्याने फक्त भारतातच तिचे शो बंद केले नाही तर केस करण्याची धमकी देखील दिली आहे. सोमीने सलमानचे नाव न घेता त्याच्यावर सिगारेटने चटके दिल्याचा आणि शोषण केल्याचा आरोप केला आहे. सोमीची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
सोमीने पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, आता खूप काही होणार आहे. माझे शो भारतामध्ये बंद करण्यात आले आणि माझ्यावर केस करण्याची धमकी देखील देण्यात आली. तू खूप भित्रा माणूस आहेस. इथे माझं रक्षण करण्यासाठी 50 वकील उभे आहेत. तू मला अनेक वर्ष शारीरिक शोषण केलेस आणि मला सिगारेटने भाजलेस. या सोबतच सोमीने शिव्या देखील या पोस्टमध्ये दिल्या आहेत. सलमानला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रींचा सोमीने धिक्कार केला आहे.

Related Articles

Back to top button