सोलापूर
तमिळ चित्रपट पाहून उच्चशिक्षित तरुणीने चोरल्या 13 सायकली

सोलापूर शहरातील क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उच्चशिक्षित असलेल्या एका तरुणीने शहरातील सुमारे 13 चोरल्याची घटना समोर येत आहे. सोलापुरातील विविध भागातून महागड्या सायकली चोरणाऱ्या संबंधित तरुणीला शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सोलापुरातील कोणार्क नगर, लिटिल फ्लावर स्कूल, होटगी रोड, जुळे सोलापूर येथील सायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. यामुळे पोलीस प्रशासन ही चक्रावून गेले. याबाबत कोणार्क नगर येथील चंद्रकांत मेहत्रे यांनी पोलिसात फिर्याद दिली.
याबाबत तपासाची सूत्रे हलवून पोलिसांनी संबंधित आरोपी तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी सध्या डिप्लोमाचे शिक्षण घेत असून सध्या ती प्रथम वर्षात शिकत आहे. घरची हलाखीची परिस्थिती व शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे आपण सायकली चोरल्याची कबुली या तरुणीने पोलिसांना दिली आहे. धक्कादायक म्हणजे एक तमिळ सिनेमा पाहून आपण हा मार्ग स्वीकारला, असेही तिने स्पष्ट केले.



