क्राईम
श्रद्धा हत्येचा खटला ॲड. उज्ज्वल निकम लढवणार

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिली. मुंबई दौऱ्यावर असलेले बिर्ला यांची डॉ. गोऱ्हे यांनी भेटी घेतली.
- यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या भेटीदरम्यान उभयंतांमध्ये महिला अत्याचाराबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावर त्यांनी त्वरित संमती देत याबाबत कार्यवाही करीत असल्याचे सांगितले होते. श्रद्धा वालकर खून प्रकरणात पकडला गेलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशा स्वरूपाच्या मागण्या या निवेदनामध्ये त्यांनी केल्या आहेत.