महाराष्ट्र
पंतप्रधानांना हात जोडून विनंती…प्लीज या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा

छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात कोश्यारी बोलत होते.
राज्यपालांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आता त्यांच्या वक्तव्यावर माजी खासदार संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट पंतप्रधानांना विनंती करत राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढण्याची मागणी केली आहे. राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असे मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नको आम्हाला, असे त्यांनी म्हटलं.