भारताविरूद्ध मैदानात AK 47!

Admin
1 Min Read
  1. आशिया चषकातील सुपर 4 सामन्यात काल टीम इंडियाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने 6 गडी राखून पाकिस्तानवर सलग दुसरा विजय मिळवला. टीम इंडियाचा फलंदाज अभिषेक शर्माने 74 धावांचा पल्ला गाठला तर शुभमनने त्याला साथ दिली. सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजाच्या कृतीवरुन सध्या नेटकरी चांगलेच संतापले आहेत. पाकिस्तानचा फलंदाज फरहानने अर्धशतकानंतर बॅट हातात धरुन गोळीबार स्टाईल केली. त्यामुळे नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
  2. काही दिवसांपूर्वीच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दोन्ही देशांत संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. 14 सप्टेंबर भारत पाक सामन्याला तीव्र विरोध करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे नो हॅंडशेकमुळे वाद झाला. हा वाद नमलाच नाही तोवर आणखी एक वाद झाला. पाकचा सलामीवीर साहिबझादा फरहानने स्टेडियममध्ये केलेल्या सेलिब्रेशनमुळे नेटकरी आक्रमक झाले.
  3. साहिबझादा याने टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानसाठी सर्वाधिक 58 धावा केल्या. साहिबझादाने या दरम्यान 34 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. साहिबझादाने अर्धशतकाचे सेलिब्रेशन ज्या पद्धतीने केले त्यानंतर सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे. साहिबझादाने अर्धशतकानंतर बॅट बंदूकीप्रमाणे हातात धरली आणि फायरिंग करण्याची ॲक्शन केली. साहिबझादाच्या या ॲक्शनने आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
Share This Article