- गरबा खेळण्याची प्रॅक्टिस करत असतानाच एका महिलेचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशमधील मंदसौर येथील खानपुरा येथे ही घटना घडली. गरबा खेळणाऱ्या एका महिलेचे काही पुरूषांनी अपहरण केले. त्यांनी तिला फरफटत नेले. त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- समोर आलेल्या माहितीनुसार, खानपुरा येथील भावसार धर्मशाळेत महिला आणि तरुणी गरबा खेळण्याची प्रॅक्टिस करत होत्या. याचवेळी गरबा खेळत असताना चार तरुण आणि दोन महिला आल्या आणि गरबा खेळणाऱ्या महिलेला पकडले आणि तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून उपस्थित असलेले सर्वजण घाबरून गेले, इकडे तिकडे पळाले. त्यातूनही एक तरुणी तिच्या बचावासाठी आली. परंतु आरोपी महिलांनी तिला ढकलले. त्यानंतर त्यांनी महिलेला फरफटत नेले.
- या घटनेनंतर उपस्थित असलेल्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. तपासणी दरम्यान, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आणि महिलेची सुटका केली.
गरबा खेळणाऱ्या महिलेला उचलले
