- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस असून जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोदी हे आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या धार जिल्हातून बोलताना मोदी यांनी म्हटले की, पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचे सिंदूर उजाडले. आम्ही ऑपरेशन सिंदूर करून दहशतवादी ठिकाणे उद्धवस्थ केली. आमच्या वीर जवानांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. आता कालच देश आणि जगाने बघितले की, पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रडून रडून आपली परिस्थिती सांगितली आहे. हा नवीन भारत आहे. हा कोणाच्या परमाणू धमकींना भीत नाही.
- हा नवीन भारत आहे. घरात घुसून मारतो. आजच्याच दिवशी भारतीय सैन्याने अनेक अत्याचारापासून हैद्राबादला मुक्त केले. त्यांच्या अधिकारांची रक्षा करत भारताच्या गौरवाला प्रस्थापित केले होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आम्हाला प्रेरणा देतो. आम्ही जगलो तरीही देशासाठी, प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होवो, असेही मोदी यांनी म्हटले.
हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो…
