ब्रेकिंग! आयुष कोमकर हत्याकांडाचा मास्टरमाइंड अटकेत

Admin
1 Min Read
  • पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडातील फरार आरोपी व आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकर अखेर आज सकाळी पुणे पोलिसांना शरण आला आहे. या प्रकरणात आधीच बंडू आंदेकरसह ८ आरोपींना अटक झाली आहे.
  • गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी नाना पेठेत आयुषवर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. आयुष क्लासवरून परत येऊन इमारतीच्या पार्किंगमध्ये मोटारसायकल लावत असताना दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेतच आयुषचा जागीच मृत्यू झाला.
  • मागील वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला घेण्यासाठीच हे हत्याकांड रचण्यात आले. मृत आयुष हा वनराजचा भाचा होता. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी बंडू आंदेकरसह ८ जणांना अटक केली होती. मात्र, कृष्णा आंदेकर फरार होता. अखेर तो आज पोलिसांना शरण आला. 
Share This Article