- बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमसला गावात उपसरपंच राहिलेल्या गोविंद बर्गे यांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गोविंद बर्गे यांचा मृत्यू आत्महत्या की घातपात यावर संशय निर्माण झाला असून, या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. नुकतीच या घटनेत अडकलेल्या नर्तकी पूजा गायकवाड हिने पोलिसांसमोर मोठी कबुली दिली आहे.
- गोविंद बर्गे विवाहीत असूनही त्यांनी नर्तकी पूजावर जीवापाड प्रेम केले. तिच्यासाठी पैसा, दागिने, मोबाईल इतकंच नव्हे तर घर बांधण्यासाठीही आर्थिक मदत केली. मात्र एवढ्यावरच पूजाच्या मागण्या थांबल्या नाहीत. गेवराईतील बंगला तसेच भावाच्या नावावर जमीन करून देण्याची मागणी तिने सातत्याने केली. या मागण्या पूर्ण न झाल्यास बलात्काराचा गुन्हा लावण्याची धमकी देत ती त्यांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली आहे.
- या दबावामुळेच बर्गे तणावाखाली होते. त्यांनी आपल्या काही मित्रांना आपली व्यथा सांगितली होती. “मी खूप निराश झालोय” अशी कबुली त्यांनी जवळच्या मित्राला दिल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे.
- या प्रकरणी गोविंद यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी पूजावर थेट आरोप केले. त्यानंतर वैराग पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. सध्या ती तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत असून चौकशीत तिने बर्गे यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले आहे. ही तिची पहिली मोठी कबुली असल्याने तपासाला नवीन वळण मिळाले आहे.
किलर पूजाने गोविंद बर्गेंबद्दल दिली धक्कादायक कबुली
