- पुण्यातील आंदेकर- कोमकर गँगवॉरमुळे संपूर्ण शहर हादरलेले असताना पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. आयुष उर्फ गोविंदा कोमकर हत्येच्या तपासात आणखी धागेदोरे मिळवण्यासाठी मुख्य आरोपींपैकी बंडू राणोजी आंदेकर याला पोलिसांनी नाना पेठेत आणून त्याच्या घराची झाडाझडती घेतली आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे काही हाती लागतात का? यासाठी तपास केला.
- गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष
- याचा खून आंदेकर टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. वनराज आंदेकरांचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगकडून काही केलं जाऊ शकतं याची शक्यता होती म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मात्र आंदेकरच्या टोळीने गणेश कोमकरचा मुलगा टार्गेट केल्याने गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात एकच खळबळ उडाली होती.
- या कारवाईदरम्यान आयुष कोमकर हत्येच्या प्रकरणात काही नवे पुरावे हाती लागतात का हे तपासण्यात आले. पोलिसांच्या या हालचालीमुळे आंदेकर टोळीच्या नांग्या ठेचण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, खरंच पोलीस असं करतील का आणि पुण्यातील गॅंगवॉर संपवतील का? याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
बंडू आंदेकरला मध्यरात्री नाना पेठेत आणले
