- बीड शहरातील चऱ्हाटा फाटा परिसरातून शुक्रवारी सायंकाळी एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले. नागनाथ नन्नवरे असे या व्यक्तीचे नाव असून सुमारे 10 ते 12 जणांनी नागनाथ यांना लाकडी दांड्याने मारहाण करून फरफटत गाडीत टाकून अपहरण केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अवघ्या 14 तासांत नागनाथ यांची सुटका केली.
- पोलिसांनी केलेल्या तपासानुसार हे अपहरण प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. नागनाथची पूर्वीची गर्लफ्रेंडने, ज्योती काळे हिने पुण्यातील गुंडांना सुपारी देऊन हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. अपहरणकर्त्यांनी नागनाथ यांना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील टोकवाडी येथे नेऊन डांबून ठेवले होते.
- दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली.
- दिया नन्नवरे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे नागनाथसोबत 11 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. यापूर्वी नागनाथचे ज्योतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, ज्योती त्याला सतत ब्लॅकमेल करत होती. याच कारणामुळे तिने हे अपहरण घडवून आणले.
एका व्यक्तीसाठी दोन प्रेयसींची ‘भानगड’ ठरली डोकेदुखी
