- पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील सत्र न्यायालयात पार पडली. या सुनावणीत आरोपींना हजर करण्यात आले.
- ही हत्या बंडू आंदेकर यांनी केल्याचा संशय आहे. मात्र याच बंडूच्या कोर्टातील जबाबामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
- सुनावणी दरम्यान, आयुष कोमकर हत्येतला मुख्य आरोपी बंडू आंदेकर याने न्यायालयात एक दावा करत खळबळ उडवून दिली. या सगळ्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्याने केला. शिवाय ते केरळमध्ये होते. अशा स्थितीत या हत्येशी किंवा या हत्येच्या कटाशी आपला काय संबंध असा प्रश्न कोर्टात त्याने उपस्थित केला होता.
- दुसरीकडे युक्तिवाद करताना सरकारी वकील यांचे म्हणणे होते की, एकूण 16 मुद्दे आहेत. त्यामध्ये हत्येत वापरलेल शस्त्र, ते कुठून आले, गुन्हा करतानाचे कपडे, फरार असलेले 5 आरोपी आणि इतर बाबींची चौकशी आणि तपास करायचा आहे.
- त्यावर आरोपी बंडू आंदेकरच्या वकिलाचे म्हणणे होते की, गेल्या 10 ते 12 तासांपासून हे सर्व जण अटकेत आहेत. जी FIR दाखल केली आहे ती चुकीची आहे. मी माझा नातवाला का मारेन? माझा वैर त्याच्याशी नाही. मला मारायचे असते तर मी माझा प्रतिस्पर्धकाला मारेन. तर जेव्हा माझा मुलाला मारला होता, तेव्हा मी माझा फिर्यादीत माझा मुलीचं नाव घेतले म्हणून तिच्या सासरकडच्याने माझं नाव या प्रकरणात घेतले.
- दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने अटक केलेल्या 6 आरोपींना 15 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कृष्णा आंदेकर, शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि शिवराज आंदेकर या पाच फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना कधी यश येते हे पाहण महत्वाचे असणार आहे.
- आरोपी बंडू आंदेकरने कोर्टात जे सांगितले त्याने संभ्रम वाढला
आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट!
