- महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीए आघाडीचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला.
- राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ९८.२ टक्के मतदान झाले. एकूण ७८८ मतदारांपैकी ७ जागा रिक्त होत्या, त्यामुळे ७८१ मतदार पात्र होते. यापैकी ७६७ खासदारांनी मतदान केले, त्यातील ७५२ मते वैध ठरली, तर १५ मते अवैध ठरली.
- राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांची या निवडणुकीसाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारत राष्ट्र समिती (४ राज्यसभा खासदार), बीजू जनता दल (७ राज्यसभा खासदार) आणि शिरोमणी अकाली दल (१ लोकसभा आणि २ राज्यसभा खासदार) यांनी मतदानात भाग घेतला नाही.
- निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
ब्रेकिंग! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती
