तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू

Admin
2 Min Read
  • अलिकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेने महिलांवर सासरी होणार्‍या छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
  • ही घटना दक्षिण बंगळुरूच्या सद्दागुंटेपलया भागात घडली. शिल्पा असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणीचे नाव आहे. तर तिच्या पतीचे नाव प्रवीण आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. विवाहापूर्वी शिल्पा इन्फोसिसमध्ये काम करत होती. मात्र, विवाहानंतर तिने नोकरी सोडली. प्रवीणदेखील ओरॅकल कंपनीत नोकरीला होता. पण लग्नानंतर वर्षभरात त्याने देखील नोकरी सोडली आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. दोघांना दीड वर्षांचा एक मुलगा देखील आहे.
  • शिल्पाच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे की, सासरचे लोक तिच्याकडून सतत पैशांची मागणी करत होते आणि यासाठी तिला त्रासही द्यायचे. याच त्रासाला कंटाळून शिल्पाने आत्महत्या केली आहे.
  • शिल्पाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिल्पाच्या सासरच्या लोकांनी लग्नाच्या वेळी पंधरा लाख रोख, दीडशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि घरातील इतर महागड्या वस्तूंची मागणी केली होती. ही मागणी देखील पूर्ण केली. पण त्यानंतरही शिल्पाच्या सासरकडच्या लोकांनी आणखी पैसे आणि दागिन्यांची मागणी करायला सुरुवात केली. यासाठी ते शिल्पावर दबाव टाकत होते. तसेच तिला तिच्या दिसण्यावरूनही सतत टोमणे मारले जायचे. सततच्या या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप शिल्पाच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, शिल्पाच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून बंगळुरू पोलिसांनी तिचा पती प्रवीणला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे.
Share This Article