ब्रेकिंग! मराठवाड्यात ढगफुटी सृदृश्य पाऊस, सोलापुरात संततधार

Admin
1 Min Read
  • मराठवाड्यात काल-परवापासून नांदेड, लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून नांदेडनंतर लातूरमध्येही पूरस्थिती आहे. लातूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या दहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर आता लातूर-नांदेड जिल्ह्यात बचाव कार्यासाठी पुन्हा एकदा लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
  • जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यात पूर परिस्थितीमुळे पुरात अडकलेल्या दहा जणांची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरिकांनी यशस्वीपणे सुटका केली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत पथकाने ही बचाव कार्ये यशस्वीरीत्या पूर्ण केली. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्याचे एक पथक लातूरच्या अहमदपूर येथे पाचारण करण्यात आले आहे.
  • नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, मुखेड, देगलूर, लोहा, कंधार, नांदेड या तालुक्यांना फटका बसला होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नांदेड -हैद्राबाद, देगलूर -उदगीर, नरसी -बिलोली रस्ते बंद पडले. दरम्यान सोलापुरातही संततधार  पाऊस पडत आहे.
Share This Article