- नवऱ्याने पत्नीच्या फोटोसह स्टेट्स ठेवला आणि भावपूर्ण श्रद्धांजली असे त्याला कॅप्शन दिले. त्यानंतर पत्नीचा खून केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला आहे. विद्या विजय राठोड (वय 32) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव विजय राठोड असे आहे.
- आधी पत्नीच्या फोटोसह भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवत तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील जिंतूर जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील शेत शिवारात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विद्या विजय राठोड या 32 वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीने तीक्ष्ण हत्याराने छाती आणि पोटावर वार करत तिचा खून केल्याची घटना घडली.
- आरोपी पती सध्या फरार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या घटनेचा तपास सध्या पोलीस करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा खून करण्याआधीच विजयने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर पत्नीचा फोटो आणि ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे स्टेटस ठेवले होते.
- दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता, ज्यामुळे पत्नी विद्या माहेरी राहायला आली होती. काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विद्या तिच्या वडिलांच्या शेतात असताना विजय तेथे पोहोचला. तिथे दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. या वादातून संतापलेल्या विजयने आपल्या हातातील धारदार हत्याराने विद्यावर वार केल्याचे सांगण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली बायको
