- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेले मराठा बांधवांचे वादळ मुंबईमध्ये दाखल झाले आहे. लाखो मराठा बांधव आणि हजारो गाड्यांच्या ताफ्यासह मनोज जरांगे हे राजधानीत दाखल झाले आहेत.
- दरम्यान, मला आश्चर्य वाटत आहे की, तुम्हाला हे आज दिसत आहे. यापूर्वी काय झाले हे सर्वांनी बघितले आहे. आजही आंदोलनाकरता राजकीय रिसोर्सेस करणारे कोण आहेत? आमच्यासाठी हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्मातून पाहू, काही राजकीय पक्ष जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे नुकसान होईल, फायदा काही होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांचा निशाणा कोणावर, याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
मनोज जरांगे यांच्यामागे कोणाची ताकद?
