मध्य प्रदेशातील महू येथे ‘रण संवाद 2025’ या दोन दिवसीय तिन्ही सैन्यदलांच्या परिषदेत आज भारताचे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. शांती हवी असेल तर युद्धासाठी तयार रहा, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारत नेहमीच शांतीच्या बाजूने राहिला आहे. परंतु, शक्तीशिवाय शांतता केवळ स्वप्नच राहते. पण शांती टिकवण्यासाठी शक्ती आवश्यक आहे आणि शांती हवी असेल तर युद्धाची तयारी करा, असे ते म्हणाले.
जनरल चौहान यांनी सांगितले की, भारत एक शांतताप्रिय देश आहे, पण शक्तीशिवाय शांतता ही केवळ एक कल्पनारम्य आहे. भारत एक शांतताप्रेमी राष्ट्र आहे, परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांततावादी मानले जाऊ नये. शांतता राखण्यासाठी शक्ती आवश्यक आहे, असे म्हणत त्यांनी एका लॅटिन म्हणीचा दाखला ते म्हणाले, जर तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार रहा. ते म्हणाले, आजच्या काळात युद्धाचे स्वरूप बदलत आहे. सायबर हल्ले, हायब्रिड वॉरफेअर, आणि नवीन तंत्रज्ञानामुळे युद्धक्षेत्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. अशा परिस्थितीत भारताला सज्ज राहावे लागेल.