- पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सूरज ठोंबरे याला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहरातून त्याची धिंड काढण्यात आली. यावेळी त्याला बेडूक उड्या मारत नेण्यात आले. गुन्हेगारी विश्वात गाजलेले नाव असलेल्या ठोंबरेला अशी शिक्षा देत पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे.
- ठोंबरे हा वडिलांच्या उपचारांसाठी दोन दिवसांच्या जामिनावर बाहेर आला होता. या काळात त्याने पुण्यातील झेड ब्रिज परिसरात तब्बल पाचशे मुलांना गोळा करून एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत अनेक तडीपार गुन्हेगार, टोळीप्रमुख आणि जामिनावर असलेले आरोपी उपस्थित होते. या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या हलगर्जीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
- कार्यक्रमावेळी पोलिस पोहोचणार असल्याचे लक्षात येताच ठोंबरे हा पिस्तुलं काढून हवेत धरणाऱ्या साथीदारांच्या गराड्यातून गाडीत बसून पसार झाला. महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यांना त्रास दिल्यामुळे तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार ओंकार कदमसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होता. पोलिसांना मात्र सुरुवातीला या जमावाबाबत काहीही माहिती नव्हती.
- या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ठोंबरेचा शोध सुरू केला आणि अखेर रविवारी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची शहरातून धिंड काढत बेडूक उड्या मारायला लावण्यात आल्या.
दोनशे पोरांचा गराडा, हवेत बंदुका, वनराज आंदेकरांच्या मारेकऱ्याची पोलिसांनी जिरवली
