अलीकडे झालेल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी लंडनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताचा तिरंगा घेऊन रस्त्यावर आलेल्या काही भारतीय मुस्लिम तरुणींना पाकिस्तानी तरुणांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी तरुण त्यांच्या देशाचा झेंडा फडकवत आहेत, तर त्याचवेळी भारतीय तरुणी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत आहेत.
या घटनेदरम्यान पाकिस्तानी तरुणांनी भारतीय तरुणींच्या हातून तिरंगा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भारतीय तरुणींनी हार मानली नाही आणि मोठ्या धैर्याने त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी पाकिस्तानी तरुणांना मागे रेटले आणि त्याच वेळी ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
सोशल मीडियावर या तरुणींच्या धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, या तरुणींनी केवळ देशाचा मान राखला नाही, तर अशा परिस्थितीत कसे वागावे, हे देखील दाखवून दिले आहे.