खेळ
ब्रेकिंग! आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा

- आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचे निवड समीतीचे प्रमुख आजित आगरकर यांनी पत्रकार परिषेदत आशिया कपसाठी भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर केली. संघ व्यवस्थापनाने या स्पर्धेसाठी एकूण 15 खेळाडूंची निवड केली आहे.
- संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे आहे. तर उपकर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 विश्वचषकाचा विचार करुन टीम मॅनेजमेंटने हा संघ निवडला आहे.
- आशिया कपसाठी भारतीय संघ- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), हार्दिक पंड्या, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.राखीव खेळाडू- रियान पराग, यशस्वी जयस्वाल, प्रसिध्द कृष्णा, वाॅशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.



