एकदम झकास! सूर्याची ब्रँड व्हॅल्यू दोनशे पटीने वाढली

ऑस्ट्रेलिया झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी समाधानकारक झाली नाही. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचा प्रवास येथेच थांबला. भारतीय फलंदाजांनी निराशा केल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.विराट कोहली, सूर्यकुमार यादव वगळता अन्य फलंदाज चमकले नाहीत. विराट आणि सूर्यकुमार या दोघांनी सातत्य दाखवले.
त्यांनी आक्रमक फटकेबाजी करून संघाला विजयी केले होते. मात्र सेमी फायनलमध्ये भारताचा घात झाला. यामुळे टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर पडली.
मात्र वर्ल्ड कपमधील शानदार कामगिरी करणाऱ्या सूर्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू तब्बल दोनशे पटींनी वाढली आहे. भारताच्या या धडाकेबाज फलंदाजाची मैदानातच नव्हे तर मैदानाबाहेर देखील मोठी चर्चा होत असते. सूर्या आपल्या कामगिरीत सातत्य दाखवत आहे. त्याची फटकेबाजी नयनरम्य असते. चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्याला आपल्या जाहिरातीत घेण्यासाठी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे.
ट्वेंटी वर्ल्ड कपमधील जबरदस्त कामगिरीमुळे सूर्याची डिमांड वाढली आहे. सूर्या सध्या चार ब्रँड सोबत जोडला गेलेला आहे. मात्र आता त्यात मोठी वाढ होऊ शकेल. आयपीएल स्पर्धेच्या आधी सूर्या वीस लाख रुपये फी आकारात होता. आता त्यात वाढ करून ती सत्तर लाख रुपयांपर्यंत केली आहे. सूर्याने आयपीएल स्पर्धेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
सुरुवातीला त्याला दहा लाख रुपये मिळाले होते. मात्र चालू वर्षाच्या आयपीएलसाठी त्याला सुमारे आठ कोटी रुपये मिळाले. सध्या सूर्याकडे सुमारे 32 कोटीची मालमत्ता आहे. तो मॅक्सीमा वॉच, सरीन स्पोर्ट्स, निमन शूज यासारख्या ब्रँडच्या जाहिरातीत झळकत आहे.