राजकीय

भाजपचा नवा मास्टर प्लॅन गेम

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान, अबकी बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपाची चिंता चांगलीच वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे भाजपला चारशेचा आकडा गाठणे अवघड होताना दिसत आहे.
म्हणूनच आता भाजपाने आपल्या प्रचारासाठी नवा मास्टर प्लॅन आखला आहे. आता निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराचे वेगळे मुद्दे असणार आहेत. आता भाजपाकडून प्रचारासाठी ‘सब का साथ, सब का विकास’ ऐवजी हिंदू -मुस्लीम विषयाला धरून सामाजिक तुष्टीकरणावर जोर दिला जाणार आहे. याशिवाय हिंदू मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी भाजपाने प्रचाराची नव्याने आखणी केली आहे.
मतदान वाढविण्यासाठी भाजपाने संघटना सक्रिय केल्या आहेत. बूथ कमिटीच्या सदस्यांना घरोघरी मतदानाच्या चिठ्ठया वाटण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंदू मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या उरलेल्या पाच टप्प्यात ज्या ज्या राज्यामध्ये मतदान होणे आहे तेथील हिंदू मतदारांनी जागरूक होण्याची खूप गरज आहे.

Related Articles

Back to top button