देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यानंतर मोदींनी भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.
मोदी म्हणाले, पहलगाममध्ये अतिरेक्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून मारले. त्यानंतर भारतीय सैन्याचे ऑपरेशन सिंदूर म्हणजे देशाच्या संतापाची अभिव्यक्ती होती. सैन्याला आम्ही पूर्ण मुभा दिली होती. त्यामुळे या मोहिमेत टार्गेट त्यांनीच निवडले आणि कारवाई देखील केली. पाकिस्तानात काय नुकसान झाले याच्या बात्म्या रोजच येत असतात. भारतीय सैन्याच्या या मोहिमेत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले.
आज आपल्याला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंनाा त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. सिंधू पाणीवाटप करार हा अतिशय अन्यायकारक होता, असे मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले.
मोदी म्हणाले, भारत आज मिशन ग्रीननुसार, भारत अणुऊर्जेवर पुढाकार घेत आहेत. २०४७ पर्यंत भारत विकसित होईल हे ध्येय आहे. बदल ही निरंतर प्रक्रीया असून बदल करावेच लागतात. परमाणू ऊर्जेचे द्वार उघडले असून शक्तीशाली होत आहेत.
मोदी पुढे म्हणाले, आम्ही २०३० पर्यंत क्लिन एनर्जी ५० टक्क्यांपर्यंत वाढवणार आहोत, हा संकल्प आम्ही पूर्ण केला. हे ध्येय आम्ही २०२५ च्या आतच आम्ही हे ध्येय साकारले. कारण विश्वाप्रती, निसर्गाप्रती आम्ही जबाबदार आहोत. पेट्रोल, डिझेल गॅससाठी लाखो करोडो रुपये खर्च होत असे. पण आता आपण ऊर्जेवर स्वंयपूर्ण झालो आहोत, हा पैसा वाचत असून हा खर्च आत्मनिर्भरता आणि देशाला विकसित करण्यासाठी वापरत आहोत. समुद्रमंथन आम्ही पुढे नेत आहोत आणि समुद्रातून तेल, नैसर्गिक साठे शोधण्यासाठी मिशन मोड तयार करत आहोत, नॅशनल डीप वाॅटर अॅस्पेरिशन मिशन आपण सुरु करत आहोत. मोदी यांची ही महत्वपूर्ण घोषणा आहे.