अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात कठोर धोरण अवलंबले आहे. परंतु, चीनला कायमच धारेवर धरणारे ट्रम्प यांनी अचानक यूटर्न घेतला आहे. टॅरिफ युद्धाच्या सुरुवातीनंतर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध टोकाला पोहोचले होते. परंतु, आता दोन्ही देशांत वाद बऱ्यापैकी निवळला आहे. यातच ट्रम्प यांनी चीनला आणखी एक दिलासा दिला आहे. टॅरिफ लागू करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यातच आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे चीनने अमिरेकेची सोयाबीन खरेदी करावे, अशी इच्छा ट्रम्प यांची असून यासाठी प्रशासनाकडून चीनची मनधरणी केली जात आहे.
सोमवारी ट्रम्प यांनी चीनला मोठा दिलासा दिला. चीनवर लागू होणाऱ्या टॅरिफला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. म्हणजेच चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर तीन महिने कोणताही टॅरिफ आकारला जाणार नाही. चीनने अमेरिकी सोयाबीनची खरेदी वाढवावी, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली. या माध्यमातून दोन्ही देशांतील व्यापार तूट देखील कमी होईल, असे सांगण्यात आले.