राज्यात एका भागात एका टोळक्याने रात्री उशिरा कोयता आणि इतर हत्यारांसह फिरत आरडाओरडा करून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडला. या टोळक्याच्या दहशतीमुळे स्थानिक रहिवाशांनी आपली घरे बंद करून सुरक्षितता राखली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या दहशतवादी टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या येरवड्यातील गणेशनगर भागात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी सात संशयितांपैकी पाच अल्पवयीन मुलांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले. तर दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये शैलेश राजू मोहिते (वय 19) आणि रितेश संतोष खुडे (वय 19), दोघेही लक्ष्मीनगर, येरवडाचे रहिवासी आहेत. दरम्यान यातील गुंडांची येरवडा पोलिसांनी धिंड काढली. तसेच गुंडाना बुरखा घालून फिरवले.