इच्छाधारी नागाप्रमाणे शरद पवारांची भूमिका!

Admin
1 Min Read
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काल नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवून ओबीसी जनजागृतीसाठी ‘मंडल यात्रा’ सुरू केली. या यात्रेचा उद्देश ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती करणे, आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी मतदारांचे समर्थन मिळवायचे आहे. यात्रेची सुरुवात विदर्भातील 11 जिल्ह्यांपासून झाली असून, ती राज्यभरात पसरवण्याची योजना आहे.
  • दरम्यान या मंडल यात्रेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांनी पवार यांना ‘इच्छाधारी नागा’प्रमाणे भूमिका बदलणारा नेता म्हणून संबोधले आहे. हाके यांच्या म्हणण्यानुसार, पवार हे ओबीसी समाजाच्या मुद्द्यांवर बोलत असले तरी, त्यांच्या मागील कारभारात ओबीसी समाजाच्या हिताचे उल्लंघन झाले आहे. त्यांनी ओबीसी महामंडळांसाठी निधी मंजूर न केल्याचा आरोप केला आहे. हाके यांच्या या टीकेमुळे राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • शरद पवार यांनी आता ओबीसींची झुल पांघरली आहे. नागपूरमधून मंडल यात्रा सुरु केली आहे. इच्छाधारी नागाप्रमाणे भूमिका बदलण्यात पवार पटाईत आहेत. मनोज जरांगेंना मांडीवर घेवून गोंजारणारे पवार अचानक ओबीसींची बाजू घेण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप हाके यांनी केला आहे.

Share This Article