क्राईम
ब्रेकिंग! मस्साजोग प्रकरणात पॉवरफुल नेता अडकणार?

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. तर, दुसरीकडे या प्रकरणाचा पार्ट-2 सुरू झाला असून स्वत: ला निर्दोष समजणाऱ्यांविरोधात पुरावे समोर आणणार असल्याचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले. दरम्यान धनंजय देशमुख यांचा रोख कोणावर आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये एक राजकीय नेता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
- या केसचा पार्ट टू सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी मुख्य आरोपी छाती ठोकून सांगत होता की, आरोपींना फाशी द्या. असे सांगत तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आता तो या प्रकरणात तो स्वत: एक क्रमांकचा आरोपी आहे. या प्रकरणातील स्वत: ला निर्दोष समजत आहेत. लोकांसमोरही ते तसेच भासवत आहेत. मात्र, निर्दोष असल्याचा दावा करणाऱ्याविरोधांत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले होते की, सीआयडीला काही पुरावे मिळाले असते तर आणखी गुन्हेगार झाले असते. परंतु तपास अजून संपला नाही. पुरवणी आरोपपत्र दाखल होणे बाकी आहे. षडयंत्र करणारे सगळे लोक आरोपी आहेत, हे त्यांनाही माहिती आहे आणि समाजालाही माहिती आहे. परंतु अजून कागदावर आलेले नाही. आता हेच कागदावर आणणार असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.