ब्रेकिंग! भारताला टॅरिफ बॉम्बची धमकी देणारे ट्रम्प तात्या आले अडचणीत

Admin
2 Min Read
  • भारतावर 25 टक्के टॅरिफ कर लादण्याच्या घोषणेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड्र ट्रम्प यांना भारताने प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान,24 तासांतच ट्रम्प यांनी पुन्हा तात्काळ भारतावर मोठा टॅरिफ लादण्याची घोषणा केली, त्यामुळे आता हा मुद्दा प्रतिष्ठेचा आणि दोन देशांच्या नातेसंबंधावर परिणामकारक ठरू शकतो, अशातच ट्रम्प यांना सबुरीचा सल्ला घ्या, असा सल्ला त्यांच्याच देशातील बड्या हस्तीने दिला आहे. 
  • ट्रम्प अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून जगासाठी डोकेदुखी ठरत आहेत. अवास्तव ताणून धरण्याची वृत्ती, बाजारपेठ, कंपन्या विरोधकांसह नोकरदारांना लक्ष्य करणे सुरुच आहे. अशातच टॅरिफने तर कहरच केला. भारतावर 25 टक्के कर लादण्याच्या सततच्या धमकीनंतर भारतानेही याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे भारत मागे हटायला तयार नाही हे ट्रम्प यांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी चोवीस तासांतच टॅरिफसंदर्भात घोषणा केली आहे.
  • भारतावर टॅरिफ लादण्याच्या धमकीनंतर पूर्व दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हेली यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी ट्रम्प यांना भारतासारख्या मजबूत सहयोगी देशासोबत संबंध खराब करु नये, असा सल्ला दिला आहे. त्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या असून त्यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेच्या दूत म्हणून काम केलेले आहे. 
  • हेली यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये… पण आपला शत्रू आणि रशियन आणि इराणी तेलाचा नंबर एक खरेदीदार असलेल्या चीनला 90 दिवसांची टॅरिफ सूट मिळाली आहे. चीनला सूट देऊ नका आणि भारतासारख्या मजबूत मित्राशी असलेले तुमचे संबंध खराब करू नका.
  • दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प प्रशासनाला अप्रत्यक्षरित्या आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर रशियानेही भारताचे समर्थन केले आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले की, रशियन व्यापारी भागीदारांविरुद्धचे कोणतेही विधान “धोका” मानले जाईल. आम्ही अशी अनेक विधाने ऐकतो जी प्रत्यक्षात धमक्या आहेत. देशांना रशियाशी व्यापार संबंध तोडण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न आहेत. आम्ही अशा विधानांना कायदेशीर मानत नाही, पेस्कोव्ह पुढे म्हणाले.
Share This Article