- पुण्यातील खेडमध्ये आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून आईने मुलीच्या नवऱ्याला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची व मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता (वय २८) यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केले आहे. प्राजक्ता हिने विश्वनाथ सोबत पळून जाऊन लग्न केल्याने समाजात आपली नाक कापल्याच्या रागातून मुलीच्या आईने आणि तिच्या भावाने मुलीचे अपहरण करत तिच्या नवऱ्याला म्हणजेच विश्वनाथला ३ ऑगस्ट रोजी बेदम मारहाण केली.
- हे सगळे भर चौकात घडल्याने उपस्थितांनी मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून खेड पोलिस ठाण्यामध्ये मुलीची आई आणि भाऊ यांच्यासह १५ जणांविरोधात अपहरण, जबर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ब्रेकिंग! पुण्यात सैराटचा थरार
