ब्रेकिंग! जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा जागीच खात्मा

Admin
1 Min Read
  • जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत गेल्या तीन दिवसांपासून धुमश्चक्री सुरू आहे. पहलगामनंतर मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. त्यात दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरात जोरदार गोळीबार सुरू आहे. त्यात आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले आहे. तर, एक जवान जखमी झाला आहे. आणखी दोन दहशतवादी लपून बसल्याचे समोर आले आहे. त्यांचा शोध सुरूच आहे.
  • दहशतवाद्यांना शोधण्यासाठी व्यापक शोध मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये हायटेक सर्व्हिलांस सिस्टिम, विशेष अर्धसैनिक दलाची तुकडी, जम्मू काश्मीर डीजीपी, लष्कर हे सर्व मिळून अँटी टेरर ऑपरेशनवर करडी नजर ठेऊन आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेशल ऑपेरशन ग्रुप, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांचे हे संयुक्त अभियान आहे. यामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यात येत आहे.
  • एका पोलिस अधिकाऱ्याने महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार गुप्त माहिती मिळाल्यानंतर एक ऑगस्ट रोजीपासून दक्षिण काश्मीरमध्ये व्यापक शोध मोहीम राबवण्यात आली. मोहीम सुरू होताच घाबरलेल्या दहशतवाद्यांनी अखल दाट जंगलात सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
Share This Article