- पुण्यातील पिंपरीच्या मध्यवस्तीत भरदिवसा आणि भरबाजारात एका व्यापारी तरुणावर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज घडली. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- या गोळीबारात व्यापारी तरुणाच्या पायाला गोळी लागली असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
- पिंपरी कॅम्प मार्केट परिसरात दुपारी वीस वर्षीय व्यापारी भावेश कंकरानी याच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. हल्लेखोराने बाईकवर येत त्याच्या दुकानासमोरच त्याच्यावर थेट गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात कंकरानी याच्या पायाला गोळी लागली असून त्यांना तत्काळ पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर हल्लेखोराने भावेश यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवले, असेही प्राथमिक माहितीत स्पष्ट झाले आहे. हल्लेखोराचा उद्देश फक्त चोरीचा होता की इतर कोणता, याचा तपास सुरू आहे.
- गोळीबाराची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ब्रेकिंग! बाईकवरून आले अन् गोळीबार करून फरार झाले
