- राज्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिलेचे नाव आशा घुले (वय ३८) असे आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुकृपा कॉलनी येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांची गळा दाबून हत्या केली.
- घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे डीसीपी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू असून काही संशयितांवर देखरेख ठेवण्यात येत आहे.
घरात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या
