सोलापूर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मित्र नगर शेळगी येथे घडली. याप्रकरणी फारूक करीन शेख (वय-४४, रा. मित्र नगर, शेळगी) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जुबेर निसार मुल्ला (रा. मित्र नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी कामावर येत असताना वरील संशयित आरोपी याने फिर्यादीला फोन करून बोलावून घेऊन तू माझ्याबद्दल लोकांना काय खोटे सांगून नावाची बदनामी करत आहे. असे म्हणत शिवीगाळ करून लाकडाने डोक्यात व पायावर मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भोगशेट्टी हे करीत आहेत.