ब्रेकिंग! माजी मंत्र्याचा दोन मुलांसह भाजपमध्ये प्रवेश

Admin
1 Min Read
  • राज्यात राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सगळीकडे ज्या भाजप पक्षाची चर्चा आहे त्या पक्षाला खऱ्या अर्थाने वाडी वस्ती तांड्यावर पोहोचविण्याचे श्रेय ज्यांना जाते त्या पहिल्या फळीतील नेते अण्णा डांगे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे. 
  • मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज डांगे, त्यांचे पुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनी भाजप प्रवेश केला. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते देखील भाजपमध्ये दाखल झाले.
  • डांगे यांनी सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर भाजपमध्ये कार्य केले. 1995 मध्ये ते ग्रामीण विकासमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री होते. 
  • महाविकास आघाडीच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते फारसे सक्रिय नव्हते. आता पुन्हा भाजपमध्ये कमबॅक करत त्यांनी पक्षाला सांगली जिल्ह्यात बळकटी दिली आहे.
  • डांगे हे धनगर समाजाचे प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी आरक्षण, ‘धनगड’ विरुद्ध ‘धनगर’ या वादावरही भूमिका घेतली होती. त्यामुळे, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे धनगर समाजाचा झुकाव पुन्हा भाजपकडे वळण्याची शक्यता आहे.
Share This Article