ऑगस्ट महिन्यात बँका किती दिवस राहणार बंद?

Admin
1 Min Read
  • ऑगस्ट महिन्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ऑगस्ट 2025 च्या अधिकृत बँक सुट्टीच्या यादीवर एक नजर टाकणे महत्त्वाचे ठरेल. यंदा ऑगस्ट महिन्यात देशभरात काही दिवस सुट्ट्या असतील. यामध्ये स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, जनमाष्टमी यांसारख्या सणांसह प्रादेशिक सण व दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवारी राहणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
  • राष्ट्रीय आणि प्रादेशिक
  • बँक सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक :
  • ३ ऑगस्ट (रविवार) : सर्व भारतभर बँका बंद, साप्ताहिक सुट्टी.
  • ९ ऑगस्ट (शनिवार) : दुसरा शनिवार म्हणून सर्वत्र सुट्टी.
  • १० ऑगस्ट (रविवार) : रविवारी सर्व बँका बंद.
  • १५ ऑगस्ट (शुक्रवार) : स्वातंत्र्य दिन, पारसी नववर्ष (शहंशाही) व जनमाष्टमी, संपूर्ण भारतात बँका बंद.
  • १६ ऑगस्ट (शनिवार) : जनमाष्टमी / कृष्ण जन्माष्टमी निमित्त खालील शहरांमध्ये बँका बंद : अहमदाबाद, आयझॉल, भोपाळ, रांची, चंदीगड, चेन्नई, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, पटना, रायपूर, शिलाँग, जम्मू, श्रीनगर, विजयवाडा.
  • १७ ऑगस्ट (रविवार) : सर्वत्र रविवारी सुट्टी.
  • २३ ऑगस्ट (शनिवार) : चौथा शनिवार, संपूर्ण भारतात बँका बंद.
  • २४ ऑगस्ट (रविवार) : रविवारी साप्ताहिक सुट्टी.
  • ३१ ऑगस्ट (रविवार) : महिन्याचा शेवटचा रविवार, सर्व बँका बंद.
Share This Article