ऑनलाईन रम्मीचा डाव अन् आयुष्य उद्ध्वस्त

Admin
1 Min Read
  • कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानमंडळात ऑनलाईन रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमुळे केवळ मंत्र्यांच्या वर्तनावरच नव्हे, तर ऑनलाइन रम्मीच्या वाढत्या व्यसनाधीनतेवर आणि त्यातून असंख्य तरुणाईचे उद्ध्वस्त होत असलेल्या आयुष्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे.
  • ऑनलाइन रम्मीच्या व्यसनात अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या गेमच्या नादात कित्येकांनी आपली शेतजमीन गहाण ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हे व्यसन किती खोलवर रुजले आहे, हे एका घटनेतून स्पष्ट होते.
  • सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जय जाधव या तरुणाचे आयुष्य याच ऑनलाइन व्यसनापायी उद्ध्वस्त झाले आहे. अवघ्या २६ व्या वर्षीच त्याच्या डोक्यावर तब्बल ८४ लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. जयने रिअल इस्टेटच्या व्यवसायातून पिंपरी-चिंचवडमध्ये उभे केलेले २३ लाख रुपये या गेममध्ये गमावले. एवढेच नव्हे, तर त्याने मित्रमंडळीकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले.
  • याशिवाय, करमाळा येथील त्याची वडिलोपार्जित दीड एकर शेती आणि स्वतःची स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेवून त्याने आणखी २० लाख रुपयांचे कर्ज उचलले. या सर्व व्यवहारांतून जयच्या डोक्यावर जवळपास ८४ लाख रुपयांचे प्रचंड कर्ज झाले आहे, ज्यामुळे त्याचे भविष्य अंधकारमय झाले आहे. तरुणांनी या व्यसनापासून दूर राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Share This Article