महाराष्ट्र
ब्रेकिंग! देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व

- पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे.
- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी गडकरींच्या नावाची घोषणा केली आहे. गडकरी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचा साऱ्यांनीच आनंद व्यक्त केला. खासदार संजय राऊतांनी देखील गडकरींसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
- गडकरी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील मातब्बर नेते मंडळींपैकी एक आहेत. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. गडकरी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राऊतांनी एक्सवर एक खास पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले की, देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राजकारणातील योग्य व्यक्तीचा गौरव केल्याबद्दल पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे कौतुक!, असे ते म्हणाले.
- दरम्यान, एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.
- या पुरस्कार वितरण समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते या पुरस्कार वितरण होईल.



