माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव यांनी काही खळबळजनक खुलासे केले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केले आहे. तसेच मनसेशी युतीबाबत अद्याप चर्चा का झालेली नाही? या प्रश्नाचे उत्तर सूचक शब्दांत त्यांनी या मुलाखतीत दिले आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावे, अशी लोकांची मागणी आहे, असे राऊत यांनी विचारले. त्यावर 20 वर्षांनी आम्ही एकत्र आलो. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलेच पाहिजे, असे काही नाही. पण मी जे म्हटले मराठी भाषेसाठी, मराठी धर्मासाठी, मराठी अस्मितेसाठी जे जे करण्याची गरज आहे ते ते करण्याची माझी तयारी आहे. यासंदर्भात माझी राज ठाकरेंशी चर्चा होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तसेच आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरणही उद्धव यांनी दिले आहे.