ब्रेकिंग! धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात काही मिनिटांचीच सुनावणी

Admin
2 Min Read
  • शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे लागले होते. धनुष्यबाण चिन्हावरची आजची सुनावणी संपली. पुढची तारीख ऑगस्टमध्ये देण्यात आली आहे. आता पुढच्या महिन्यात यावर सुनावणी होणार आहे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने न्यायालयाकडे तात्पुरता आदेश (अंतरिम रिलीफ) मागितला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच – जिथे अजित पवार गटाला चिन्ह वापरण्याची तात्पुरती परवानगी मिळाली होती, तसेच निर्णय व्हावा, अशी त्यांची अपेक्षा होती. दुसरीकडे शिंदे गटाच्या वकिलांनी यास विरोध दर्शवला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आधीच शिंदे गट ‘शिवसेना’ नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्हाखाली लढल्या असून न्यायालयाने यापूर्वी ठाकरे यांची अशीच मागणी फेटाळली होती, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.
  • जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले अन् मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर आपला दावा सादर केला. 16 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता दिली आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देखील दिले. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.
  • न्यायमूर्ती सूर्यकांत आणि बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील, असे सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ, असे सांगितले. आता या प्रकरणाची सुनावणी ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकाआधी धनुष्यबाण कोणाच्या हातात जाणार हे कळणार आहे.
Share This Article