- गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली. तसेच अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. राजकीय क्षेत्रात भाजपचा रोज नवा धमाका दिसून येत आहे. यामुळे भाजप बळकट होत आहे. मात्र याच भाजपला आता मोठा धक्का बसला आहे.
- तेलंगणा भाजपमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीसंदर्भात सुरू असलेला वाद आता उफाळून आला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गोषामहलचे तीन वेळाचे आमदार आणि फायरब्रँड नेते टी. राजा सिंह यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एन. रामचंदर राव यांना संभाव्य प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या चर्चेमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
- राजा सिंह यांनी आरोप केला आहे की, काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी केंद्रीय नेतृत्वाला चुकीची माहिती देऊन पडद्यामागे निर्णय घेत आहेत. दुर्दैवाने काही लोक केंद्रीय नेतृत्वाला चुकीची माहिती देत आहेत. यामुळे जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बलिदान आणि पक्षाच्या संभावना दोन्ही कमकुवत होत आहेत.
- गप्प राहण्याला अनेकांनी सहमती समजू नये. मी केवळ माझ्यासाठी नव्हे, तर असंख्य कार्यकर्ते आणि मतदारांच्यावतीने बोलत आहे. कार्यकर्ते आणि मतदार आपल्या पाठिशी, आपल्यासाठी पूर्ण विश्वासाने उभे राहिले. आज त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जय श्रीराम, असे राजा सिंह यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.
भाजपला तगडा झटका, फायरब्रँड आमदाराने पक्ष सोडला
