- गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेला ‘हेरा फेरी ३’ चा वाद आता संपुष्टात आला आहे. यासंदर्भात खुद्द या चित्रपटातील बाबूभैय्या ही भुमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी सांगितले आहे. त्यामुळे हेराफेरी ३ मध्ये पुन्हा एकदा अक्षयकुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.
- हेराफेरी, फिर हेराफेरी हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. पहिल्या चित्रपटापासूनच बाबूभैय्या आणि त्यांचे दोन सहकारी यांनी चित्रपटात धमाल केली होती. या त्रिकुटांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता ‘हेरा फेरी ३’मध्येही हे त्रिकुट दिसणार हे स्पष्ट झाले आहे.
- हा चित्रपट त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत होता. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यानंतर हा चित्रपट वादात सापडला, जेव्हा परेश रावल यांनी चित्रपटापासून स्वतःला दूर केल्याचे सांगितले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या निर्माते आणि परेश रावल यांच्यात कायदेशीर नोटीस नाट्यही रंगले. त्यानंतर परेश यांनी व्याजासह साइनिंगची रक्कम परत केल्याचे एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते.
- आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कारण चित्रपटाचा वाद आता संपला आहे. हेरा फेरी ३ मध्ये परेश रावल परतले आहेत. याची स्पष्टता स्वतः परेश रावल यांनी दिली आहे.
अखेर वाद मिटला! परेश रावल ‘हेरा फेरी 3’ मध्ये झळकणार
