भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पती, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्यात बिनसले असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. सानियाच्या एका इंस्टाग्राम पोस्टनंतर हे दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता.
आता माहिती मिळत आहे की, सानिया आणि शोएब यांच्यामध्ये घटस्फोट झाला आहे. मलिकच्या अगदी जवळच्या व्यक्तीने इनसाइडस्पोर्ट नावाच्या वेबसाइटला ही माहिती दिली आहे. 12 एप्रिल 2010 रोजी सानिया आणि शोएब यांनी विवाह केला होता. 2018 मध्ये सानियाला मुलगा झाला. या मुलाचं नाव इजहान आहे.
सानिया आणि शोएब बराच काळ वेगळे राहत होते, पण आता दोघांनी औपचारिक घटस्फोट घेतला आहे. ज्या व्यक्तीने हा खुलासा केला तो शोएबच्या पाकिस्तानातील व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे. त्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले, होय, आता या दोघांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. मी अधिक काही उघड करू शकत नाही. पण ते वेगळे झाले आहेत, याची पुष्टी करू शकतो.