राजकीय
गुजरातमधील तरुण मतदारांचा भाजपला पाठिंबा

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुजरातची निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून विरोधकांना धूळ चारण्यासाठी पक्षनेतृत्वाने कंबर कसली आहे.
गुजरातमधील निवडणुकीच्या गोंधळात सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले. निष्कर्षानुसार, गुजरातमध्ये भाजपला 25 वर्षांपर्यंतच्या 43 टक्के मतदारांचा सर्वाधिक पाठिंबा मिळू शकतो. यानंतर काँग्रेसला 35 टक्के, आम आदमी पार्टीला 17 टक्के आणि इतरांना 5 टक्के मते मिळू शकतात.