केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना थेट तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोठे वक्तव्य केले. गडकरी म्हणाले, काही टोल कंपन्या नखरे करत आहेत. मी ठरवले आहे. जर कामात कसूर केली, तर अशा कंत्राटदारांना थेट तुरुंगात टाकणार आहे. आता टोल नाके बंद झाले आहेत आणि नवीन तंत्रज्ञान वापरून टोल संकलन सुरू आहे. त्यामुळे कोणताही चुकारपणा सहन केला जाणार नाही.
त्यांच्या या थेट आणि स्पष्ट भाषेत दिलेल्या इशाऱ्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील आणि खासगी कंत्राटदारांमध्ये खळबळ माजली आहे.
पुण्यातील कार्यक्रमात गडकरी यांनी सांगितले की, देशात तीन लाख कोटी रुपये खर्चून बोगदे (टनेल्स) बांधले जाणार आहेत. सध्या टनेल मशीन चीनमधून आयात करावी लागते, परंतु चीनकडून खरेदी शक्य नसल्याने भारतातच त्यांचे उत्पादन सुरू करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने टनेल बांधणीसाठी AI वापरणे आणि पर्यायी इंधनावर चालणाऱ्या यंत्रांचा उपयोग होणे आवश्यक आहे.