ब्रेकिंग! एक लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर

Admin
1 Min Read
  • सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोन्याचे भाव वाढण्यामागे इराण-इस्त्रायल संघर्ष आणि कमकुवत झालेला रुपया कारणीभूत ठरला आहे. आता सोन्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. कारण सोन्याचे भाव तब्बल एक लाख रुपये पार गेले आहेत.
  • आज सोन्याच्या भावात वाढ दिसून आली. गत काही काळापासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. आज भारतात २४ कॅरेट सोने प्रति ग्रॅम १०,१८२ रुपये दराने विकले जात आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९,३३४ रुपयेवर दर पोहोचले आहेत. १८ कॅरेट सोने आज ७,६३७ रुपये दरात विकले जात आहे.
  • इस्रायल-इराण तणावादरम्यान, सोन्याने एक लाखाचा टप्पा ओलांडला. सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरतेमुळे कमी जास्त होत आहेत. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे भारतात सध्या लग्नसराई सुरु आहे. अशा हंगामात आणि गुंतवणूकीची योजना आखणाऱ्यांसाठी, सोन्याच्या किमतींवर लक्ष ठेवण्याची ही महत्वाची वेळ आहे.
  • भारतात आज २४ कॅरेट सोन्याचे किती भाव आहेत- १ ग्रॅम: १०,१८२ रुपये, ८ ग्रॅम: ८१,४५६ रुपये, १० ग्रॅम: १,०१,८२० रुपये.
Share This Article